Sunday, September 28, 2008

ऐसा गा मी श्वान

रात्रीचे वाजायला आले होते.... रस्त्यावरची वर्दळ कमी कमी होत होती... चाकरमाने घरी परतत होते... सुदाम ची गाड़ी नेहमीच्या जागी उभी होती... गाडीवर चहा वाफाळत होता आणि दुसऱ्या शेगडीवर बुर्जिचा घाणा सुटत होता... भज्यांची थाळी भरून वहात होती... त्यांचा मस्त खमंग वास शौकिनाना खुणावत होता... महापालिकेच्या दिव्याच्या उजेडात मन्डळी भरपेट ताव मारत होती...पावाच्या फैरी रिचत होत्या... मधुनच एखादा तुकडा खाली पडत होता... गाडीवर ही धांदल चालु होती...तशी नेहमीचीच....

टाग्या गाडीखाली दबा धरून बसला होता....त्याची नजर चौफेर फिरत होती... पडलेल्या पावाच्या तुकड्यावर अचूक पडत होती आणि दुसऱ्याच क्षणी तो तुकडा टाग्या पटकावत होता...